सोलापूरच्या अन्न प्रशासन विभागाला मिळाले दोन सहाय्यक आयुक्त....
![सोलापूरच्या अन्न प्रशासन विभागाला मिळाले दोन सहाय्यक आयुक्त....](https://news15marathi.com/uploads/images/202212/image_750x_639c269bc7f8b.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : प्रवीण मखरे
सोलापूर : सोलापूर अन्न व औषध प्रशासन विभागाला गुरुवारी नवे अधिकारी मिळाले असून, आता अन्न प्रशासनात 2 सहायक आयुक्त असणार आहेत. परभणीचे सुनील जिंतूरकर हे नव्याने रुजू झाले असून, सहाय्यक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांनी त्यांचे स्वागत केले.
अन्न प्रशासनामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील तालुके विभागून देण्यात आले आहेत. राऊत यांच्याकडे सोलापूर शहरासह, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर हे तालुके देण्यात आलेत. तर सुनील जिंतूरकर यांच्याकडे मोहोळ, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, उत्तर सोलापूर, करमाळा हे तालुके आहेत.
जिंतूरकर हे अन्न सुरक्षा अधिकारी पदावरून पदोन्नतीने आले आहेत. त्यांनी यापूर्वी हिंगोली, नांदेड, जालना, परभणी याठिकाणी काम केले आहे. अन्न विभागाला दोन अधिकारी आल्याने कामाचे विभाजन होईल, नियंत्रण ठेवले जाईल. सध्या अन्न विभागात सुरक्षा अधिकाऱ्याच्या 9 पोस्ट मंजूर त्यात 6 ऍक्टिव्ह 3 रिक्त आहेत.