आय.टी.आय जुनियर संघाने पटकवला चषक
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विकास संघटनेने आयोजित केलेल्या विदयार्थी विकास चषक २०२४ क्रिकेट स्पर्धचा अंतिम सामना आय. टी.आय.ज्युनियर संघाने जिंकून चषक पटकावला. स्पर्धेत तालुक्यातील विविध संघांनी सहभाग घेतला होता, स्पर्धेसाठी प्रथम म्हणून पारितोषिक 2000 रु. चषक द्वितीय पारितोषिक 1500 रु. चषक व तृतीय पारितोषिक 1100 रु. चषक ठेवण्यात आले होते.
या स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक डी. बॉयज दिंडोरी तर तृतीय पारितोषिक दिंडोरी हॉस्टेल या टीमने पटकावले स्पर्धेला अध्यक्ष नितीन बोढारे शिवसेना शिव आरोग्य सेना जिल्हाध्यक्ष डॉ.विलास देशमुख, भाजपाचे तुषार वाघमारे, नगरसेवक सुजित मुरकुटे,यांनी सहकार्य केले. तर स्पर्धा यशस्वेतेसाठी सचिन ढाकणे,विकी देशमुख,शिवम मेधने, मंगेश बर्डे,आदित्य गोडसे,रोशन गांगोडे,सचिन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.