कोराटे येथील वनिता कदम यांना पुरस्कार प्रदान...

कोराटे येथील वनिता कदम यांना पुरस्कार प्रदान...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील प्रगतशील शेतकरी नामदेव त्र्यंबक कदम यांच्या पत्नी वनिता कदम यांना नुकताच शारदीय नवरात्र उत्सव शारदा फाउंडेशन व द्राक्ष विज्ञान सामाजिक संस्था संचालित द्राक्ष विज्ञान मंडळाच्यावतीने नुकताच उत्कृष्ट शेती व द्राक्ष शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उल्लेखनीय शेती काम केल्याबद्दल वनिता कदम यांना द्राक्ष कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नाशिक येथे मिस ग्लोबल युनिव्हर्स (दुबई) संगीता खैरनार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी संचालक निकुंज अग्रवाल,सुमन जाधव,अनिता शर्मा,शारदा गवळी,रामदास जाधव,स्नेहा कोकणे,आदी

आदी मान्यवर उपस्थित होते.

कदम त्यांच्या पुरस्काराबद्दल कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे खासदार भास्कर भगरे आमदार नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र ढगे सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण आदी मान्यवर यांनी अभिनंदन केले आहे.