पालखेड वाशीयांची उडवली बिबट्यांनी झोप.! बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार...

पालखेड वाशीयांची उडवली बिबट्यांनी झोप.! बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे दि. 23 रोजी सायंकाळी 9  वाजेच्या सुमारास भरवस्तीमध्ये 4 बिबट्यांनी अचानक हल्ला करून बोकड्याला ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्यांनी नागरिकांची झोपच उडवली आहे या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत वृत्त असे की, पालखेड  बंधारा येथे भरवस्तीमध्ये राहणारे श्रीराम सदाशिव गाढवे यांच्या घराजवळील शेडमध्ये रात्री नऊच्या सुमारास बिबट्यांनी अचानक हल्ला करून शेळी व बोकड यांच्यावर हल्ला केला मात्र या हल्ल्यामध्ये शेळी पळून जाण्यास यशस्वी झाली परंतु बिबट्यांनी बोकड्याला ठार केले  त्यानंतर गाढवे यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी धावाधाव केल्याने बिबट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन घरांवर झेप घेत पळून गेले.गावामध्ये भरवस्तीत चार बिबटे आल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.

सध्या पालखेड,कोराटे परिसरात या बिबट्यांनी कहरच केला असून दोन दिवसांपूर्वी विलास कदम या तरुणावर हल्ला करून त्याला जखमी केले. त्याआधी बिबट्यांनी याच वस्तीत राहणारे सोळशे यांच्या 6  शेळ्या त्यानंतर मंगेश गोतरणे यांच्या तीन शेळ्या आणि आता गाढवे यांचा एक बोकड अशा एकूण दहा शेळ्या या बिबट्यांनी फस्त केल्यामुळे या मजूर वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित खात्याकडून पंचनामेही करण्यात आले आहे मात्र या नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार व या बिबट्यांचा बंदोबस्त कधी होणार हे मात्र सांगणे कठीण झाले आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून या बिबट्यांनी या परिसरात दहशत निर्माण केली असून मात्र अजूनही या बिबट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केली आहे. या परिसरामध्ये पिंजरे ही लावण्यात आले आहे मात्र अजूनही या बिबट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी संबंधित खात्याने पिंजऱ्यांचि संख्या वाढवून या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी  नागरिकांनी केली आहे करण्याची मागणी केली आहे.