गोंदिया जिल्हा परिषद अर्थ सभापती संजय टेंभरे यांनी कृषी विभागाचा घेतला आढावा...
प्रतिनिधी - आकाश वालदे, गोंदिया
गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती संजय टेंभरे यांनी गोंदिया जिल्हयातील कृषी विभागाचा आढावा घेतला असून या आढावा सभेत गोंदिया जिल्हयाच्या आठ तालुक्यातील कृषी अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
गोंदिया जिल्हयात या वर्षी खरीप हंगामात १ लक्ष ९४ हजार हेकटर शेत जमिनीवर धान पिकाची लागवड करण्यात येत असून ८० % लोकांनी कृषी विभागाकडून अनुदानावर बियाणे घेतली आहेत तर २० % लोकांनी अद्यापही बियाणे घेतली नाही तर दुसरीकडे जिल्हयात यावर्षी धान्य पिकांना लागणार युरिया आणि डी ए पी खत देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे तर अर्थ सभापती संजय टेंभरे यांनी जिल्हा परिषदेतून कृषी विभागाला दिलेला निधी कृषी अधिकऱ्यानी खर्च केला कि नाही याचा आढावा घेतला असता काही अधिकाऱ्यांना अर्थ सभापती यांनी फटकार लावली तर उर्वरित धान्य बियाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तर या वर्षी खरीप हंगाम सुरु झाला असला तरी गोंदिया जिल्हयातील आमदार आणी खासदार महोदयांनी अद्याप ही कृषी विभागाची आढावा बैठक घेतली नसल्याची खंत अर्थ बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी व्यक्त केली आहे.
तर दुसरीकडे जिल्हा परिषदेने कृषी विभागाला दिलेला निधी आणि योजना ह्या शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहचाव्या अश्या सूचना अर्थ सभापती संजय टेंभरे यांनी दिल्या आहेत.