मंगळागौर केली साजरी...
प्रतिनिधी - किरण मुक्कावार, उमरखेड
श्रावण आला की आनंद मनात मावेना,
माहेरी जाण्याचे वेद लागे, गेल्या वाचून राहावेना,
श्रावण मंगळवारी येई, मंगळागौरीची पूजन, चला ग सयांनो घेऊ गौराईचे दर्शन,
नऊवारी साड्या घालून बांगड्या डझनभर भरून भरपूर दागिने घालून गौराईचे पूजन करू,
उखाणे घेऊ खोड्या काढू, पंचपकवानाचे नैवेद्य गौरीला वाढू,
फेर धरुनी मैत्रिणी संगे झिम्मा फुगडी खेळू,
सोळा प्रकारची पत्री वाहून जागरण गौरीसाठी करु.
असा हा मंगळागौरीचा कार्यक्रम उमरखेड येथील सुनिता शरद नीलपवार यांच्या सुनबाई'चा मंगळागौरीचा कार्यक्रम केला. सर्व सखी नटून थटून असल्यामुळे कार्यक्रमाची मज्जाच मज्जा आली.