भारतातील शहरांमध्ये / खेडोपाडी जाऊन, आपल्या संस्कृती विषयी प्रबोधन...

भारतातील शहरांमध्ये / खेडोपाडी जाऊन, आपल्या संस्कृती विषयी प्रबोधन...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी या लहानशा गावातील धीरज जैन यांना दोन मुलं.! मुलगा जैनम व मुलगी जैविका यानी ५० दिवसात भारतातील शहरांमध्ये, खेडोपाडी जाऊन आपल्या संस्कृती विषयी प्रबोधन करायचे  ठरवले. विज्ञान अगदी सोप्या भाषेत इतरांना समजून सांगण्यास  सुरुवात केली. आपण विदेशातून जे शिक्षण घेऊन आले ते भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचायचे हे इतरांना ते सांगू लागले आहेत.प्रत्येक गावागावात जाऊन शाळेला भेटी देऊन विज्ञान व ज्ञानाची शिदोरी शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व ते समजावून सांगत आहे...

वडनेर खाकुर्डीचे  कांतीलाल जैन यांचे सुपुत्र धीरज जैन शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुबई येथे व्यवसाया निमित्ताने  गेले.

ते दुबईतच स्थायिक झाले.  त्यांनी अल्पावधीत व्यवसाय करून  स्वतःची वण एक्सल कंपनीची स्थापना केली.कंपनीच्या माध्यमातून अनेक नवयुकांना  रोजगार प्रदान केला.कालांतराने त्यांचा मुलगा जैनम व मुलगी जैविका  यांंना चांगले संस्कार असल्याने भारतीय संस्कृतीची जाणीव व देशाविषयी सन्मान या दोघ मुलांमध्ये निर्माण झाला.आपल्या देशाविषयी त्यांना खूप आदर प्रेम होते, म्हणून आपल्या देशासाठी काहीतरी करावे अशी इच्छा त्यांच्या मनात आली ..आणि  काही दिवसातच आई-वडिलांची परवानगी घेऊन या दोघे चिमुरड्यांनी  भारतात येऊन संकल्प केला की ५० दिवसात भारतातील अनेक शहरांमध्ये खेडोपाडी जाऊन आपल्या संस्कृती विषयी प्रबोधन करायचे या मुलांनी ठरवले.या अनुषंगाने जैनम व जैविका हे संपूर्ण भारतभर भ्रमण करत नुकतेच दिंडोरीत आले दोन हजार विद्यार्थ्यांना व्यावसायिक व विज्ञानाचे धडे दिले,यात महत्त्वाचं म्हणजे की हे या दोघे जैन भाऊ बहिणींचा आदर्श असंख्य विद्यार्थी घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रथमता ममता जैन हे मुलांशी संवाद साधता.जिवनात टाईम मॅनेजमेंट कसा वापरायचा वेळेला किती महत्व द्यायचे आपले कौशल्य कसे वाढवायचे अभ्यास करणे अवघड नाही प्रयत्न केला तर जिवनात अशक्य असे काहीच नाही...

कोरोना काळात म्हणजेच २०२० मध्ये जिविका व जैनम यांनी ५० दिवसात ५० पुस्तके वाचली त्यांच्या प्रत्येक गोष्टीत ते एक मिनिटही वाया घालवत  नाही.सर्व गुगल कॅलेंडरमध्ये मॅनेज करतात अशा एक ना अनेक विषयाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश मार्गदर्शन करत आहे.तर जिविका व जैनम यांनी वेगवेगळे मॅजिकल सायन्स इव्हेंट मुला मुलींना प्रयोगातून अगदी सोप्या पद्धतीने प्रॅक्टिकली समजून सांगत आहे.