सुरेश पुंड यांच्या "वंडरलैंड ऑफ हानी बी"या पुस्तकाचे मान्यवरांकडून प्रकाशन
![सुरेश पुंड यांच्या "वंडरलैंड ऑफ हानी बी"या पुस्तकाचे मान्यवरांकडून प्रकाशन](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65db67d1a0010.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
ओझर येथील यांत्रिकी अभियंता सुरेश पुंड यांनी लिहिलेल्या "वंडरलैंड ऑफ हनी बी" या पुस्तकाचे आज रविवार दि.२५ रोजी लोकनाथतीर्थ स्वामी महाराज महायोग ट्रस्टचे नाशिक येथील परमपूज्य प्रभुणे महाराज प्रमुख विश्वस्त यांच्या शुभहस्ते येथे शिंदे लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सी.बी.आर.टी.आयचे पुणे येथील सेवानिवृत्त सहाय्यक संचालक डॉ. धनंजय वाखळे, सुप्रकृती मधुशाळा नाशिकचे डॉ.तुकाराम निकम, कोसबाड डहाणू येथील कृषी विज्ञान केंद्राचे उत्तम सहाणे,निफाडच्या माजी आमदार माई कदम,माजी आमदार अनिल कदम,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनेक तज्ञ मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पुस्तकाचे लेखक सुरेश पुंड यांनी हे पुस्तक लिहिताना मधमाशीबाबतच्या अत्यंत बारीक सारी गोष्टीचा सखोल अभ्यास करून अत्यंत साध्या व सोप्या इंग्रजी भाषेमध्ये हे पुस्तक लिहिले आहे प्रत्येकाने या पुस्तकाचा अभ्यास करून मधमाशी हा विषय समजून घ्यावा असे नमूद केले.याप्रसंगी नाशिक परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.