दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलचा 10 वी चा निकाल 93 टक्के.! 97.6 टक्के गुण मिळवून उत्कर्षा काकुळते विद्यालयात प्रथम...

दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलचा 10 वी चा निकाल 93 टक्के.! 97.6 टक्के गुण मिळवून उत्कर्षा काकुळते विद्यालयात प्रथम...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी - महाराष्ट राज्य शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल 92.69 टक्के लागला आहे.

मार्च 2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेस एकूण 520 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी 482 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 163 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य श्रेणी मिळाली आहे.

यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम - कुमारी काकुळते उत्कर्षा रविंद्र 481 (97.6%),द्वितीय- कुमारी पिंगळ ऋतुजा संदीप 480 (97%) ,तृतीय- कुमार वडजे प्रणव राजेंद्र 474(95.4%),चौथा- कुमारी चव्हाणके तृप्ती त्र्यंबक 468 (95%),पाचवा- बोंबले श्रद्धा संदीप 466 (94.6%) गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.

यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य रमेश वडजे, उपप्राचार्य उत्तम भरसठ, पर्यवेक्षक श्रीमती प्रतिभा मापारी,श्रीमती सविता शिंदे,रावसाहेब उशीर सर्व वर्गशिक्षक,विषय शिक्षक  यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी ,दिंडोरी पेठ तालुका कार्यकारी संचालक प्रवीण नाना जाधव, शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके, डॉ.नितीन जाधव. माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव ,प्राचार्य रमेश वडजे व शालेय समितीचे जेष्ठ सदस्य, सर्व,शिक्षक व शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आहे