कवी संदीप जगताप यांचा भुईभोग हा कवितासंग्रह अभ्यासक्रमात...

कवी संदीप जगताप यांचा भुईभोग हा कवितासंग्रह  अभ्यासक्रमात...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण 

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील  येथील रहिवासी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातील नामवंत कवी संदीप जगताप यांचा; भुईभोग हा कवितासंग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या मॉडेल कॉलेजच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट केला गेला आहे. 

मागील २३ वर्षापासून चिंचखेड सारख्या छोट्या गावात स्वतःची शेती करताना शेतकऱ्यांचे दुःख वेदना व त्यावरील पर्याय सुचवणारी कविता संदीप जगताप यांनी लिहिली.केवळ दुःख वेदना मांडून शेतकऱ्यांच्या जगण्यात बदल होणार नाही.म्हणून प्रश्नावर पर्याय सुचवणारी व शेतकऱ्यांना लढण्याचे बळ देणारी कविता संदीप जगताप यांनी लिहिली.२००९ मध्ये प्रकाशित झालेल्या भुईभोग या कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील मानाचे सात राज्य पुरस्कार मिळाले.संदीप जगताप यांची कविता अभ्यासक्रमापेक्षा जनतेमध्ये जास्त लोकप्रिय झाली.२०१७ च्या शेतकरी संपामध्ये संदीप जगताप यांची कविता शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतली. त्यानंतर संदीप जगताप यांनी शेतकरी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.व नंतरच्या अनेक आंदोलनांमध्ये संदीप जगताप यांची कविता प्रेरणादायी ठरली.संदीप जगताप हा कवी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढणारा असल्यामुळे लोकांना स्वतःचा कवी वाटू लागला. 

ऐक लढणाऱ्या कवीचा कवितासंग्रह अभ्यासक्रमाला लागला याचा राज्यभरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया - 

मागील २३ वर्षापासून मी प्रामाणिकपणे कविता लिहिली आहे. माझी कविता शेतकरी आणि त्याच्या जगण्याच्या भोवती फिरत राहिली. मी शेतकऱ्यांना संघर्ष करायला नेहमी प्रेरित केले.कविता लिहून माझं काम संपलं नाही.मी स्वतः देखील शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये आज सक्रिय काम करतो आहे.वाणी आणि लेखणी या दोन्हीच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही चांगलं व्हावं यासाठी धडपडतो आहे .त्यामुळे माझी कविता जगण्याची कविता आहे.तेवीस वर्षानंतर कुठेतरी अभ्यास मंडळाला माझ्या संग्रहाचा अभ्यासक्रमात सहभाग करून घ्यावा वाटला.याचा मला निश्चित आनंद झालाय.मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचा व सर्व सदस्यांचा मी मनापासून ऋणी आहे.

- संदीप जगताप

प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना