येश तरोणे ची NMMS परीक्षेत गगनभरारी.! शाळेतून प्रथम तर जिल्ह्यात चौथा क्रमांक

येश तरोणे ची NMMS परीक्षेत गगनभरारी.! शाळेतून प्रथम तर जिल्ह्यात चौथा क्रमांक

प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया

सडक- अर्जुनी : शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेमध्ये अल्पावधीत आघाडीवर आलेल्या नवजीवन विद्यालय, राका शाळेतील विद्यार्थी यशकुमार विलास तरोणे याने महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक दुर्बल घटकांमधील एन. एम. एम. एस. या शिष्यवृत्ती परीक्षेत गगन भरारी घेत; शाळेतून प्रथम क्रमांक तर जिल्ह्यातून चौथा क्रमांक पटकाविला आहे. यशकुमारने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यशकुमार  हा नवजीवन विद्यालय, राका येथील गुणवंत विद्यार्थी आहे.  मागच्या अनेक महिन्यांपासून तो NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत होता. महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेत राज्यातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. गोंदिया जिल्ह्यातून ही आठवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने ही परीक्षा दिली होती. दरम्यान नवजीवन विद्यालयातील 12 विद्यार्थ्यांनी यात घवघवीत यश मिळविले आहे. 

यामध्ये यशकुमार ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे नवजीवन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्री. चुटे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.