मुडाना येथे धाडसी चोरी.! 1 लाख 70 हजार नगद आणि सोनं / चांदी लंपास...

मुडाना येथे धाडसी चोरी.! 1 लाख 70 हजार नगद आणि सोनं / चांदी लंपास...

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, महागाव

महागाव तालुक्यातील मुडाना येथे आकाश पानपट्टे यांच्या घरी दि. 5 रोजी मध्यरात्री धाडसी चोरी झाली असून, त्यामध्ये 1 लाख 70 हजार रुपये नगद आणि दोन तोळे सोनं 16 तोळे चांदी असा एवज चोरटे घेऊन  पसार झाले आहे.

आकाश पानपट्टे यांच्या भावाचा साक्षगंधाचा कार्यक्रम काल दिनांक पाच रोजी संगमनेर येथे होता त्यासाठी ते संगमनेर येथे गेले होते आज सकाळी काही मंडळी घरी वापस आल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसला असल्याचे सांगितले आहे पुढील तपास महागाव पोलीस करत आहे.