धक्कादायक घटना.! जादुटोण्याच्या संश आणि गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं...

धक्कादायक घटना.! जादुटोण्याच्या संश आणि गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं...

NEWS15 मराठी रिपोर्ट - गडचिरोली

देशात आणि राज्यात जादूटोण्याच्या घटेनवरून अनेक गुन्हे घडत आहेत. आणि यावर आळा बसावा तसेच अशा जादूटोनेला कोणी बळी पडू नये म्हणून शासनाने राज्यात त या संबंधी कायदाही बनवला आहे. परंतु, आजही राज्यात जादूटोणा सारख्या अनेक घटना समोर येत असून, यातून अनेकांचे नुकसान किंबहुना बळी देखील गेले आहेत. 

अशीच एक घटणा समोर आली असून, सदर घटणा पूर्णतः जादूटोणेची नसली तरी.! जादूटोण्याच्या संशयावरून चक्क दोघांना जीवंत जाळल्याची घटणा समोर आली आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून एका महिलेसह दोन जणांवर लोकांनी हल्ला करून जिवंत जाळल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेप्रकरणी किमान 15 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली.

तर धक्कादायक बाब म्हणजे.!  महिलेला जाळणाऱ्या आरोपींमध्ये तिचा पती, मुलगा आणि इतर कुटुंबीयांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; 1 मे रोजी गावातील काही लोकांनी एकत्र येऊन पंचायत बोलावली आणि आरोप केला की दोन पीडिते काळ्या जादूमध्ये सामील आहेत. साडेतीन वर्षांच्या आरोही बंडू तेलमी या बालकाचा जादूटोण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.  मुलाच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी दोघांना पकडले, त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि पेटवून देण्यापूर्वी त्यांच्यावर पेट्रोल टाकले. जमनी देवाजी तेलामी (52) आणि देशू कटिया अटलामी (57) अशी मृतांची नावे आहेत.

एटापल्लीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी दिलेल्यामाहितीनुसार... 

"बरसेवाडा गावातील रहिवासी असलेल्या जमनी देवाजी तेलामी या महिलेवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना संशय होता. जमनी या जादूटोणा करत असून, कुटुंबातील सदस्यांवर त्याचा वापर करत असल्याचा त्यांचा संशय बळावलेला होता. काही दिवसांपूर्वी जमनी तेलामी यांची साडेतीन वर्षांची चिमुकली नात आरोही तेलामी हिचा मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू जादूटोण्यामुळं झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांना आला होता," असं कदम म्हणाले.

त्यानंतर काही दिवसांत जमनी यांच्या सुनेचा गर्भपात झाल्यामुळं त्यांनी आरोही पाठोपाठ दुसरं बाळही गमावलं. त्यामुळं त्यांच्यावर दुःखाचा प्रचंड मोठा डोंगर कोसळला होता.  जमनी तेलामी या करणी करतात अशी चर्चा गावामध्ये आधीच पसरलेली होती. त्यात कुटुंबातील अशा घटनानंतर कुटुंबीयांनाही जमनी यांच्यावर त्या जादूटोणा करत असल्याचा संशय आला. अखेर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जमनी यांचे पती देवाजी तेलामी यांनी 1 मे रोजी रात्री ग्रामस्थ आणि पंचायतीची बैठक बोलावली. यामध्ये त्यांना या सगळ्याबाबत विचारणा करण्यात आली. जमनी यावी मला जादूटोणा करता येत नाही, असं त्यावेळी सांगितलं. देवू कटिया अतलामी जादूटोणा करत असल्याचं त्या म्हणाल्या असं त्यांच्या भावानं पोलिसांना सांगितलं. यानंतर दोघांनाही पंचायतीसमोरच अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्यानंतर गावाशेजारच्या ओढ्यात नेऊन दोघांनाही पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

याप्रकरणी जननीचा वासामुंडी येथे राहणारा भाऊ शाहू मोहनंदा याने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी १५ जणांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी दिली. सर्व आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायालय, अहेरी येथे हजर केले असता सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली. तर अजय बापू तेलामी, भाऊजी शत्रू तेलामी, अमित सामा मडावी, मिर्चा तेलामी, बापू कांद्रू तेलामी, सोमजी कंद्रू तेलामी, दिनेश कोलू तेलामी, श्रीहरी बिरजा तेलामी, मधुकर देशू पोई, अमित उर्फ ​​नागेश रामजी तेलामी, गणेश बाजूकर अशी आरोपींची नावे आहेत. शत्रु तेलामी, देवाजी मुहोंडा तेलामी, दिवाकर देवाजी तेलामी आणि बिरजा तेलामी. सर्व बारसेवाडा गावचे रहिवासी आहेत.