मोठी बातमी : टी शर्ट व चालण्याच्या पद्धतीवरून चार महिने निरंतर तपास करून घरफोडी करणारा चोराला अटक..!

मोठी बातमी : टी शर्ट व चालण्याच्या पद्धतीवरून चार महिने निरंतर तपास करून घरफोडी करणारा चोराला अटक..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुळी गावातील अरविंद कसाळे कुटुंबासह कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. हिच संधी शोधून अज्ञात चोरट्यानी घराचा दरवाचा कडी कोयंडा तोडून घरातील २६ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या घटनेत महाळुंगे MIDC पोलिसांनी चार महिने निरंतर तपास करून आरोपीच्या टी शर्ट व त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून आरोपीची ओळख पटवून त्यास जेलबंद केले आहे.

पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून, २० सप्टेंबर २०२४ रोजी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरुळी गावातील फिर्यादी अरविंद प्रकाश कसाळे हे कुटूंबासह बाहेर गेले असता झालेल्या चोरीच्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून आणि कोणताही ठोस पुरावा नसतानाही फिर्यादीच्या घराच्या परिसरात वावरणाऱ्या संशयीत व्यक्तीविषयी माहिती प्राप्त करत होते. याच दरम्यान फिर्यादीच्या घराच्या परिसरात एक व्यक्ती संशयीतरित्या वावरत असल्याचे सी. सी. टी. व्ही फुटेजमध्ये आढळून आले. त्याची ओळख पटत नसल्याने त्याचे विषयी माहिती प्राप्त करण्यास पोलिसांना अडचण निर्माण होत होत्या. तपास अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत व्यक्ती प्रमाणे दिसणारे अनेक व्यक्तीचा तपास केला. मात्र त्यात पोलिसांना यश येत नव्हते.

महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चोराच्या टी शर्ट वरून व त्याच्या चालण्याच्या पद्धतीचा अभ्यास करून तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व सहकारी अंमलदार हे गुन्हा उघडकिस आणण्याचे प्रयत्न करत असताना वेगवेगळ्या भागात शोध घेत होते. १४ जानेवारी २०२५ रोजी तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश गायकवाड हे परेड करून परत कर्तव्यावर येत असताना स्पाईन रोड परिसरात त्यांना वरील गुन्हातील संशयीत व्यक्ती प्रमाणे एक इसम दिसून आला. त्यास तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याचा कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याने चोरलेले दागिने त्याच्या मूळगावी मौजे ढाका, जि. मोतीहारी, बिहार येथे विकले असल्याचे सांगितले. 

आरोपीने दिलेल्या माहितीवरून बिहार येथील नेपाळ सीमेवरील दुर्गम ठिकाणी जाऊन दागिने खरेदी करणारे व्यक्तीस ताब्यात घेऊन दोन्ही आरोपीकडे तपास करण्यात आला व त्यांच्याकडून चोरलेले १८ लाख रुपये किमतीचे २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. १. टूल्लूकुमार रामू राऊत(वय-२५ वर्षे)-हल्ली रा. पवारवस्ती चिखली, पुणे, मूळ रा. सराटा ढाका, बिहार, २.बालेश्वर प्रसाद नंदलाल साह(वय -४५ वर्षे), रा. बखरी खजुरी, ढाका, जि. मोतीहारी, बिहार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

सदरची कारवाई महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, पोलीस निरीक्षक(गुन्हे) प्रविण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, अमोल बोराटे, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर, अमोल माटे, मंगेश कदम, शरद खैरे, राजेश गिरी यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे हे करत आहेत.