निघोजे येथील महिंद्रा कंपनीच्या जवळ दोन व्यक्तींना तृतीयपंथीनी लुटले, तृतीयपंथी टोळ्यांचा परिसरात हैदोस...!

निघोजे येथील महिंद्रा कंपनीच्या जवळ दोन व्यक्तींना तृतीयपंथीनी लुटले, तृतीयपंथी टोळ्यांचा परिसरात हैदोस...!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : औद्योगिक वसाहत चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग असल्याने या परिसरात त्यांची फसवणूक किवा त्यांना लुटून आर्थिक दिनचर्या करणार्‍या तृतीयपंथी टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. यावर आता महाळुंगे एमआयडीसी पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

तृतीयपंथी टोळ्याच्या अनुषंगाने घडत असलेल्या गुन्ह्याच्या बाबत कडक पाऊले उचलण्यास पोलिस प्रशासनाने सुरुवात केली आहे. त्यावरून ३० एप्रिल २०२३ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यावरुण दोन तृतीयपंथी यांच्यावर महाळुंगे एमआयडिसी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

मिळालेल्या माहितीवरून ३० एप्रिल २०२३ रोजी फिर्यादी स्वप्नील मधुकर थेऊनकर(वय-३१ वर्ष) रा. ईश्वरी पॅलेस सावरदरी, ता. खेड, जि.पुणे यांच्या एका मित्रा बरोबर दूचाकीवरून सावरदरी येथे कामावरुन सुटल्यांनतर जात होते. त्यावेळी महिंद्रा सर्कलजवळ तळवडे ते महाळुंगे रोडवर दोन तृतीयपंथी यांनी टाळ्या वाजवित फिर्यादीच्या जावळ गेल्याने त्यांनी गाडी थांबवली. त्यानंतर त्या तृतीयपंथी यांनी तुम्ही दोघेही आमच्या बरोबर चला असा आग्रह धरला. त्यावर फिर्यादी व त्यांच्या मित्राने त्यांच्या बरोबर जाण्यास नकार दिला असता त्यांनी फिर्यादीला पकडून त्याच्या गळ्यातील अंदाजे १४ ग्रॅमची एकूण ७७००० रुपयांची सोन्याची डिझाईंनची चैन जबरदस्तीने काढून घेतली. चैन काढून घेतल्यानंतर तृतीयपंथी यांनी फिर्यादीला व त्याच्या मित्राला मारण्याची धमकी दिली.

यावरून दोन तृतीयपंथी यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादवि कलम ३९२, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल आहे. अशा गुन्ह्यांच्या संदर्भात महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी कडक पाऊले उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. तृतीयपंथी अशा पद्धतीने त्रास देत असतील तर त्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिकारे हे करत आहेत.