डेडबॉडीला कपडा नीट गुंडाळून देतो म्हणत मागितले 2 हजार.! महापालिकेच्या रुग्णालयातील माणुसकी शून्य प्रकार...
मुंबई रिपोर्ट - नवी मुंबईच्या वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयातील शवागृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल 2 हजार रुपये लाच मागीतल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, हा प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर यावार नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ह्या माणुसकी शून्य व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. ही मुलगी मूळची कानपूर येथील असून, नवी मुंबईतील ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आई-वडील उत्तर प्रदेशहून तात्काळ नवी मुंबईत दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असता, शवागृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
अगोदर कर्मचाऱ्यांनी मृत तरुणीच्या वडिलांकडून 1 हजार रुपये मागितले होते. मात्र, नातेवाईक भावनिक अवस्थेत असल्याचे लक्षात घेऊन रक्कम थेट 2 हजारांपर्यंत वाढवली. “कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो” असे म्हणत कर्मचाऱ्यांनी थेट रोख रक्कम उकळली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.या घटनेनंतर मृत तरुणीच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या प्रशासनावर संताप व्यक्त करत जवाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“मुलीच्या मृत्यूने आधीच आम्ही खचलो आहोत, त्यातही अशा वागणुकीमुळे अधिकच वेदना झाल्या,” असं त्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
व्हिडिओ लिंक.! क्लिक करा...