धक्कादायक: नाद केला पण सपशेल वाया गेला, समाजाला आरसा दाखवणार्‍या महिलेवर अत्याचार, अरे चाकण औद्योगिक वसाहत परिसरात चाललय तरी काय?

धक्कादायक: नाद केला पण सपशेल वाया गेला, समाजाला आरसा दाखवणार्‍या महिलेवर अत्याचार, अरे चाकण औद्योगिक वसाहत परिसरात चाललय तरी काय?

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावात राहून महिलांसाठी आवाज उठवणार्‍या समाजसेविकेवर एका बहाद्दराने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या प्रेम, वासना, आर्थिक हितसंबंध यातून खर्‍या प्रेमाची पुर्णपणे परिसीमा पुसट झाल्याचे चित्र चाकण औद्योगिक वसाहत परिसरात पहावयास मिळत आहे. पण काही प्रकरणात खरोखरच महिलांवर अत्याचार,अन्याय झाला तर तिला न्याय मिळविण्यासाठी तिला मोठा संघर्षही करावा लागतो. पण सध्याची चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील चित्र बघता अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे समोर येत आहे.

अशीच काहीशी घटना महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अन्याय झालेल्या समाजसेविकेने व हुद्दयाने लेबर कॉन्ट्रॅक्टर असलेल्या महिलेच्या फिर्यादी वरून, ऑगस्ट २०२२ ते जानेवारी २०२३ या दरम्यान खराबवाडी गावच्या हद्दीतील सारा वसाहतीमध्ये आरोपी याने पीडित महिलेशी कोणत्या न कोणत्या बहाण्याने ओळख वाढवून फिर्यादीला मला तू खूप आवडते, मी तुझ्या बरोबर लग्न करतो असे प्रेमळ आमिष दाखवून बळजबरीने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा फिर्यादी महिलेने आरोपी प्रवीण काळे यांच्याकडे तू माझ्याशी लग्न करण्याची विचारणा केली असता त्याने फिर्यादिस प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर आरोपी प्रवीण काळे हा फिर्यादी पीडित महिलेचे फोन घेणे व पीडित महिलेस भेटण्यास टाळाटाळ करून तुला काय करायचे ते कर असे बोलू लागला. त्यामुळे पीडित महिला पूर्ती हादरून गेली आहे. महिलेला मोठा मानशिक धक्का बसला आहे.

वरील प्रकरणाच्या अनुषंगाने पीडित महिलेने आरोपी प्रवीण काळे, रा. वासुली, ता.खेड, जि. पुणे याच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा.द.वि कलम ३७६(२)(एन) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यास अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव हे करत आहेत.