जावयाने केली सासुची हत्या.! पत्नी व भाची गंभीर...
![जावयाने केली सासुची हत्या.! पत्नी व भाची गंभीर...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_643cbd2ddf90e.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : नारायण काळे
हिंगोली : जिल्ह्यातील आखाडा बाळापुर शहरात, किरकोळ कारणावरून जावयाने बाजेच्या ठाव्याने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या घटनेत पत्नी आणि भाच्चीलाही आरोपीने मारहाण करुन, जखमी केल्याची घटना घडली. याघटनेनंतर फरार झालेल्या जावायाला पोलीसांनी कुर्तडी शिवारातुन अटक केली आहे.
लताबाई नागोराव खिल्लारे असे मयत महिलेचे नाव असल्याचे पोलीस सुत्राकडुन माहिती मिळाली. बदनापूर जिल्हा जालना येथील अजय सोनुळे हा मागील दोन वर्षापासून पत्नीसह सासुरवाडीत राहत आहे. काही कारणास्तव किरकोळ वाद झाला आणि आरोपी जावयाने हे कृत्य केले.