धक्कादायक : खराबवाडी गावात पिस्तुलाचा धाक दाखवून व जबरी मारहाण करून लुटले..!

धक्कादायक : खराबवाडी गावात पिस्तुलाचा धाक दाखवून व जबरी मारहाण करून लुटले..!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावातील सारा सिटीबाजूकडे जाणार्‍या रोडच्या कोपर्‍यावर चाकण-तळेगाव जाणार्‍या रोडवर कंपनीतून घरी जात असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाला तीन व्यक्तीनी जबरी मारहाण व पिस्तुलाचा धाक दाखवून एका तरुणास लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसानकडून मिळालेल्या माहितीवरून, फिर्यादी शुभम बळीराम कांगणे(वय-२४ वर्षे), धंदा- नोकरी, सध्या राहणार महाळुंगे, मुळ गाव कणकरवाडी, ता. रिसोड, जि. वाशिम हा फिर्यादी ९ मे २०२३ रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान खराबवाडी गावातील सहारा सिटीकडे जाणार्‍या रोडच्या बाजूला चाकण-तळेगाव रस्त्याने राहत्या घरी पायी चालत जात असताना एम एच १४ एच एफ-८४३५ या नंबरच्या गाडीवरून तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्‍यादीकडे तंबाखू मागण्याचा बहाणा करून गाडीच्या खाली उतरुण फिर्‍यादीला शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.

त्यातील एका अनोळखी आरोपीने फिर्यादीचे हात पकडून त्याचे तोंड दाबले त्याच बरोबर इतर आरोपींनी जवळच असलेल्या पानटपरिच्या मागे ओढत नेले. त्यानंतर त्यातील एका आरोपीने कंबरेचा पिस्तूल काढून फिर्यादीला पिस्तुलाचा धाक दाखवून मी अगोदरच दोन मर्डर केले आहेत. फिर्यादीला आरोपींनी तू शांत बस तुला काही करणार नाही असे म्हणून तू फक्त तुझ्याकडील सामान आमचेकडे दे असे फिर्यादीला बोलू लागले. त्यावर ज्या आरोपीच्या हातात पिस्तूल होता त्याने पिस्तुलाच्या मुठीने फिर्यादीच्या पाठीत व डोक्यात जबरी मारहाण केली. फिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडील पॅंटच्या खिशात ठेवलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल, फिर्यादीचे पाकीट, त्यामधील ५०० रुपये रोख रक्कम व फिर्यादीचे ए टी एम कार्ड, फिर्यादीकडील असणार्‍या बॅगमधील हेडफोन तसेच कपडे बळजबरीने आरोपींनी घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या ए टी एमचा पासवर्ड धमकावून घेतला. आरोपींनी फिर्यादीला जर तू झाल्या प्रकारा बाबत आरडाओरडा केला तर, फिर्यादीला गोळ्या घालण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळा पासून पसार झाले. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन आरोपींवर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा.द. वि. स कलम ३९४ सह शस्र अधिनियम सन १९५९ चे कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटणेनंतर घटनास्थळी तात्काळ सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर, पोलिस निरीक्षक(गुन्हे) किशोर पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. आरोपींच्या शोधासाठी योग्य त्या सूचना केल्या.  

या घटनेचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण शिंदे हे करीत आहेत.