क्राईम : अटक आरोपीकडून कौशल्यपूर्ण तपास करून परजिल्ह्यात क्रूरपणे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : महाळुंगे MIDC पोलिसांच्या ताब्यातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक असणाऱ्या आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करून परजिल्ह्यात क्रूरपणे जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून अनेक गुन्हे उघडकीस करण्याची दमदार कामगिरी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या डी. बी पथकाने करून चार आरोपीना अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास सावरदरी गावचा हद्दीमध्ये प्रशांत चोपडे यांनी ऑस्टोपाईन कंपनीच्या गेटसमोर त्यांच्या मालकीची दुचाकी पार्क केली होती. ज्या ठिकाणी गाडी पार्क करण्यात आली त्या ठिकाणावरून कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी चोरून नेल्याच्या तक्रारीवरून त्यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याचा महाळुंगे पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकामधील अधिकारी व अंमलदार समांतर तपास करत असताना दरोडे विरोधी पथक, पुणे शहर यांना संशयितरित्या मिळालेल्या इसमाना पुढील तपासासाठी महाळुंगे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले होते.
या गुन्हातील ताब्यातील आरोपी यांची महाळुंगे पोलीस ठाण्याकडील डिबी पथकाचे प्रभारी अधिकारी कल्याण घाडगे व अंमलदार यांनी संशयित व्यक्तीचा गुन्हेगारी पूर्वइतिहास माहिती प्राप्त केली. त्यांच्याकडे सखोल तपास करत वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक आरोपीच्या सोबत अजून दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्या दोन्ही आरोपीचा शोध घेऊन त्यांना खेड-राजगुरूनगर परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. अटक केलेल्या चारही आरोपीकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे व अंमलदार यांनी तांत्रिक तपासाद्वारे विविध अंगाने कौशल्यपूर्ण तपास करून चौघा आरोपीनी कोपरगाव पोलीस ठाणे, अहिल्यानगर जिल्हा व गंगापूर पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत रात्रीवेळी घरामध्ये घुसून घरातील सदस्यांना मारहाण करत, चाकु व पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांचे हातपाय व तोंड बांधून त्यांच्याकडुन सोने व रोख रक्कम असा ऐवज लुटला असल्याचे निष्पन्न झाले. त्या संदर्भातील तसा गुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे निष्पन्न झाले.अटक आरोपीकडून ७ लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये चोरलेली मोटार सायकल, गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विप्टकार, जबरी चोरी करता धाक दाखविण्यासाठी वापरलेले लोखंडी पिस्टल व त्याचे ३ जिवंत काडतूस असे आरोपीकडून जप्त करण्यात आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये १. प्रसाद भारत पांडव (वय -२५ वर्षे ), रा. वेरूळ, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर, २. आशिष राजाराम भोसले (वय -१९ वर्षे ), रा. बोल्हेगाव, ता. सावेडी, जि. अहिल्यानगर, ३. ऋषिकेश नवनाथ धाकतोडे (वय -२३ वर्षे ), रा. गेवराई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, ४. शिवम उर्फ पवन रमेश भालेराव (वय -२१वर्षे ), रा. खडकी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर यांना अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाईपोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुले, पोलीस अंमलदार राजू जाधव, राजू कोणकेरी, पोलीस हवालदार अमोल बोराटे, युवराज बिराजदार, तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राजेंद्र गिरी, मंगेश कदम, राजेंद्र गिरी, हरी रणदिवे, शुभम खंडागळे, शरद खैरे, राजकुमार हनुमंते यांनी केली आहे.