मुलानेच जन्मदात्या आईचा केला खून, स्वतः घेतला गळफास... सांगवी येथील घटना...

मुलानेच जन्मदात्या आईचा केला खून, स्वतः घेतला गळफास... सांगवी येथील घटना...

प्रतिनिधी - असलम  शेख, लातूर

लातूर जिल्ह्यातील रेनापुर तालुक्यातील सांगवी येथे जन्मदात्या मुलांनेच आपल्या 70 वर्षीय आईची हत्या करून उसाच्या शेतात पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आईचा खून करून आरोपी मुलाने देखील गळफास घेत स्वतःला संपवले आहे.

दरम्यान आई शेत विक्री करण्यास विरोध करत असल्याच्या रानातून मुलाने आईला संपवल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.

दरम्यान या प्रकरणी लातूरचा रेनापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. तर अधिकचा तपास पोलीस करत आहेत.