तो वाढदिवस ठरला अखेरचा.! online मागवलेल्या केक'नं क्षणात होत्याचं नव्हतं केलं, मुलीचा मृत्यू...

तो वाढदिवस ठरला अखेरचा.! online मागवलेल्या केक'नं क्षणात होत्याचं नव्हतं केलं, मुलीचा मृत्यू...

NEWS15 मराठी रिपोर्ट - हातात स्मार्टफोन आणि नवनवीन तंत्रज्ञानामुळे घरबसल्या आपण काही हवे ते कामे सहज पूर्ण करत आहोत.! अगदी जेवण बनवण्याची'ही तसदी घेईची गरज राहिलेली नाही.! झोमॅटो, स्वीगी यासह इतर अनेक ऑनलाइन प्लेटफॉर्म मुळे हे कामही सहज झाले आहे. परंतु, अनेकदा यामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद देखील झाले आहेत. कधी आर्थिक भुर्दंड तर कधी जीवितहानी सारख्या घटना घडत आहेत.

अशीच एक धक्कादायक आणि हसत्याखेळत्या कुटुंबाला दुख: देणारी घटना घडली असून, वाढदिवसादिवशी ऑनलाईन केक मागवल्यामुळे चिमुकलीला आपला जिव गमवावा लागला आहे.

पटियालाच्या (पंजाब) अमन नगर भागात राहणारी 10 वर्षांची मुलगी मानवी हिचा 24 मार्च रोजी वाढदिवस होता. यावेळी तिची आई काजलने झोमॅटोद्वारे कान्हा फर्मकडून केक ऑर्डर केला होता. रात्री कुटुंबातील सर्वांनी केक खाऊन वाढदिवस साजरा केला. पण केक खाल्ल्यानंतर मानवीची तब्येत बिघडली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र येथे उपचारादरम्यान मानवीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मानवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी केक पाठवणाऱ्या कान्हा फर्मविरोधात तक्रार दाखल केली. मात्र चौकशी केली असता त्यांनी दिलेला पत्ता बनावट असल्याचं निष्पन्न झाले आणि तेथे असं कोणतंही दुकान नव्हतं. पोलिसांना केकचं दुकान सापडलच नाही. यानंतर, 30 मार्च रोजी मानवीच्या कुटुंबीयांनी झोमॅटोच्या माध्यमातून त्याच कान्हा फर्ममधून पुन्हा केक मागवला आणि डिलिव्हरी एजंट तो केक देण्यासाठी आला तेव्हा त्याला पकडलं. डिलिव्हरी एजंटसह पोलीस देखील केक पाठवणाऱ्या दुकानात पोहोचले असता त्यांना कळले की कान्हा फर्म बनावट असून केक न्यू इंडिया बेकरीमधून पाठवण्यात आला होता. केकमुळे मुलीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी उरलेला केक तपासता यावा म्हणून फ्रीझरमध्ये ठेवला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू इंडिया बेकरीच्या मालकाने कान्हा फर्म नावाने दुसऱ्या बेकरीची नोंदणी केली होती आणि झोमॅटोवर डिलिव्हरी करण्यासाठी त्याच नावाचा वापर केला होता. या घटनेबाबत एसपी म्हणाले की, आरोपींविरुद्ध कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकरीच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बेकरी मालक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.