ड्रेनेज वादातून सोसायटीत दगडफेक; एक जखमी, एक आरोपी अटकेत...

ड्रेनेज वादातून सोसायटीत दगडफेक; एक जखमी, एक आरोपी अटकेत...

प्रतिनिधि : विश्वनाथ केसवड चाकण,

खेड तालुक्यातील येलवाडी येथील दत्तगुरु हौसिंग सोसायटीमध्ये ड्रेनेज कॉन्ट्रिब्यूशनच्या किरकोळ वादाने अचानक हिंसक वळण घेतले. या घटनेमुळे सोसायटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीचे ड्रेनेज कॉन्ट्रिब्यूशन न भरल्याच्या कारणावरून वादाला सुरुवात झाली. हा वाद काही वेळातच चिघळत गेला आणि आरोपींनी थेट शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

आरोपींनी फिर्यादी महिला, तिचे पती आणि ६७ वर्षीय वडिलांना लक्ष्य करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली तसेच त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी मुख्य आरोपीने संतापाच्या भरात फिर्यादीच्या पतीच्या नाकावर दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले.

 या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलिसांनी BNS कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.