पुणे - नाशिक महामार्गावरील कोंडीला दिलासा; चाकणसाठी 261 कोटींचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प मंजूर...

पुणे - नाशिक महामार्गावरील कोंडीला दिलासा; चाकणसाठी 261 कोटींचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प मंजूर...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,

पुणे-नाशिक महामार्ग परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) च्या माध्यमातून ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ₹261 कोटींचा खर्च अपेक्षित असून, चाकण परिसरात चार नवीन जोडरस्ते उभारले जाणार आहेत.

*कोणते रस्ते होणार तयार?*

 हिगणे चौक ते चाकण MIDC टप्पा 3 – 900 मीटर (30 मीटर रुंदी)

 नाणेकरवाडी (सॅनी कंपनी ते समृद्धी CNG पंप) – 1.2 किमी (15 मीटर रुंदी)

बंगला वस्ती चौक ते रासे फाटा – 2.5 किमी (36 मीटर रुंदी)

पुणे-नाशिक महामार्ग ते MIDC टप्पा 5, तळेगाव MIDC मार्गे जुना मुंबई-पुणे महामार्ग – 850 मीटर (60 मीटर रुंदी)

*वाहतुकीला मोठा दिलासा*

या जोडरस्त्यांमुळे चाकणमधील प्रमुख चौकांवरील ताण कमी होणार असून, औद्योगिक वसाहतीतील वाहतूक अधिक जलद आणि सुरळीत होईल. यामुळे वाहनचालकांचा वेळ व इंधनाची बचत होणार आहे.

सध्या या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून, संपूर्ण काम सुमारे एका वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शासनाचा पुढाकार

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प मार्गी लागला असून, महायुती सरकारच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

चाकणच्या वाढत्या औद्योगिक विकासाला पूरक ठरणारा हा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प भविष्यातील ट्रॅफिक समस्यांवर मोठा दिलासा देणार असल्याचे चित्र आहे.