दिंडोरी शहरासह ग्रामीण भागातही मतदारांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद...

दिंडोरी शहरासह ग्रामीण भागातही मतदारांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

काल (दि.20) झालेल्या दिंडोरी मतदार संघामध्ये दिंडोरी शहरासह ग्रामीण भागात मतदारांनी रणरणत्या उन्हामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडली. तर काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू होते.

सकाळी सात वाजेपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ६२,३ टक्के मतदान झाले होते. शहरातील काही मतदान केंद्रावर विशेष सजावट करण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य केंद्र माहिती दर्शवणारे बॅनर, सेल्फी पॉईंट, रेड कॉर्पेट व शहरातील आदर्श मतदान केंद्रावर शासनाने पूर्णता यंत्रणा सज्ज केली होती. या मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध असल्याने मतदारांना त्याचा फायदा घेता आला तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी व वृद्धांसाठीची सोय करण्यात आली होती. 

सकाळच्या सत्रामध्ये मतदारांच्या रांगाच रांगा दिसून आल्या सकाळी ऊन कमी असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला शहरासह ग्रामीण भागातही मतदारांनी आपापल्या प्रत्येक केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच उमेदवार भास्कर भगरे व भारतीताई पवार यांनी देखील आपल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला काही ठिकाणी दिव्यांग व आजारी मतदारांना आणण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांनी वाहनांची व्यवस्था केली होती वाहनांद्वारे त्यांना घरून मतदान केंद्रावर आणण्यात आले होते. मतदारांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी काही राजकीय पक्षाच्या समर्थकांनी दोनशे फुटा नंतर मंडप लावले होते त्या ठिकाणी मतदारांना वोटर सीट काढून देणे व त्यांना नमस्कार करीत होते. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने सकाळी असलेल्या रांगा कमी दिसत होत्या तर चार नंतर पुन्हा या रांगा मोठ्या प्रमाणात दिसू लागले यावेळी प्रशासनाच्यावतीने शहरासह ग्रामीण भागातही कडेकोट बंदोबस्त ठेवला  होता. 

याशिवाय या निवडणुकीमध्ये नवतरुणांचाही मोठा उत्साह दिसून आला तरुण तरुणी नवीन जोडपे यांनी मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला मात्र असे असले तरी काही तरुणांना यादीत नाव सापडत नसल्याने काही मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता अखेर या तरुणांना माघारी जाऊन भ्रमनिरास व्हावे लागले.