वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभागी होवून योगदान द्यावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन...
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सहभागी होवून आपले योगदान देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि आपल्या वाढदिवसासोबत त्या झाडाचाही वाढदिवस साजरा करावा, अशी संकल्पना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी मांडली होती.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर- घुगे यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील फुलपाखरू उद्यान आणि बार्शी रोडवरील समाज कल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला आहे.