दिंडोरी येथे उद्या अंनिसच्या राज्य पदाधिकारी व जिल्हापदाधिकाऱ्यांची बैठक...
![दिंडोरी येथे उद्या अंनिसच्या राज्य पदाधिकारी व जिल्हापदाधिकाऱ्यांची बैठक...](https://news15marathi.com/uploads/images/202406/image_750x_66671971eefef.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी येथे दि.११ रोजी अंनिसच्या राज्यपदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांची सकाळी ९ वा. बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून शाखेच्या मागील चार महिन्यांच्या कामाचा आढावा संघटनात्मक व उपक्रमात्म कामाबाबत चर्चा करून पुढील चार महिन्यांच्या कालावधीत करावयाचे कार्यक्रम व उपक्रम याशिवाय नवीन सभासद नोंदणी करण्यासाठी अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.शामसुंदर शेळके यांनी दिली. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे महाराष्ट्र राज्यसचिव डॉ.टी.आर.गोराणे जिल्हा प्रधान सचिव नितीन बागुल हे उपस्थित राहणार आहे.तरी दिंडोरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.