शुक्रवार दि.२१ पासून निळवंडीत अखंड हरिनाम सप्ताह...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथे शुक्रवार दि.२१ रोजी प्रारंभ होत असून या सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिकीर्तन करणार आहे. या सप्ताह कालावधीत विणा पूजन,कलश पूजन, ज्ञानेश्वरी पूजन,दाळ मृदृंग संत पूजन,काकडा,हरिपाठ आदींसह पहाटे ४ ते ६ काकडा,सकाळी १० ते १२ गाथा भजन,सांंयकाळी ५ ते ६ हरिपाठ,रात्री ८३० ते १०.३० वा हरिकिर्तन होणार आहे.
शुक्रवार दि.२१ रोजी ऋषीकेश महाराज,(ठाणगांवकर,) शनिवार दि. २२ रोजी पंडीत महाराज कोल्हे (आळंदी),रविवार दि.२३ रोजी योगीराम महाराज गोसावी (पैठणकर), सोमवार दि.२४ रोजी अरुण महाराज (जामठीकर,) मंगळवार दि.२५ रोजी सुनील महाराज झांबरे (बीड), बुधवार दि.२६ ज्ञानेश्वर महाराज कदम(छोटे माऊली), गुरुवार दि.२७ रोजी निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), शुक्रवार दि.२८ रोजी दिनेश महाराज माने (लातूर) यांचे सकाळी ९ ते ११ वाजता यांचे काल्याचे किर्तन होणार असून महाप्रसाद देवून सप्ताहाची सांगता होणार आहे. गुरुवार दि.२७ रोजी दुपारी ४ वाजता दिंडी,प्रदक्षिणा सोहळा होणार आहे.तरी या अखंड हरिनाम सप्ताहाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन हनुमान मंदिर देखभाल समिती, भजनी मंडळ,स्वाध्याय परिवार,जय बाबाजी भक्तगण,सर्व बचत गट व समस्त ग्रामस्थ निळवंडी यांनी केले आहे.