तालुक्यात सुरू असलेले रस्त्यांचे सर्व कामे दर्जेदार करणार - देसले

तालुक्यात सुरू असलेले रस्त्यांचे सर्व कामे दर्जेदार करणार - देसले

प्रतिनिधी : बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यात सध्या सुरू असलेल्या सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार करून घेवू असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग दिंडोरी क्र.1 चे उपविभागीय अभियंता उमाकांत देसले यांनी दिले.

सध्या दिंडोरी तालुक्यातील जोपुळ ते जोपुळ फाटा रस्त्याचे काम करण्यात येत आहे हे काम निकृष्ट होत असल्याने तसेच या कामाचा दर्जा राखला जात नसल्याने कामात डांबर कमी प्रमाणात वापरले जात होते हे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित ठेकेदारास जाब विचारला मात्र त्यांनी मनमानी करत काम सुरू ठेवले अखेर ग्रामस्थांनी काम बंद पाडत उपविभागीय अभियंता उमाकांत देसले यांचेकडे तक्रार केली. देसले यांनी सदर  कामाच्या ठिकाणी भेट देत पाहणी करून सदर काम पुन्हा दर्जेदार करण्याचे आश्वासन दिले. सुरू करण्यात आलेल्या सर्व कामांवर लक्ष ठेवण्याच्या शाखा अभियंता यांना सूचना दिल्या असून अंदाज पत्रकानुसार सर्व कामे दर्जेदार करण्यात येतील असे देसले यांनी सांगितले. तसेच सदर काम सुरू असताना नागरिकांनी लक्ष ठेवावे काही तक्रार असल्याने आपल्याशी संपर्क साधावा.त्याचप्रमाणे कामे सुरू असताना सदर कामांवर लगेच वाहने चालवू नये पर्यायी रस्त्याचा वापर करावा सर्व नागरिकांनी सहकार्य करावे ग्रामस्थांनी जर यापुढे काम निकृष्ट झाले तर ज्या अधिकाऱ्यांची काम करून घेण्याची जबाबदारी आहे त्यांचे विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करू असे सांगितलें.