दिंडोरी तालुका पत्रकारांकडून IAS विनय पाटलांचा सत्कार...

दिंडोरी तालुका पत्रकारांकडून IAS विनय पाटलांचा सत्कार...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : प्रयत्नात सातत्य असल्यास यश हमखास भेटते.त्यामुळे यशाचे शिखर चढत असतांना अपयश आले तर खचुन न जाता आणखी जोमाने प्रयत्न केल्यास यशापर्यंत आपण नक्कीच पोहचतो असा विश्‍वास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत महाराष्ट्रात ४ क्रमांकाने तर देशात १२२ वा क्रमांक उत्तीर्ण झालेले विनय सुनील पाटील यांनी व्यक्त केला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत विनय सुनील पाटील यांनी देशात १२२ वा क्र.मिळविल्याबद्दल दिंडोरी तालुका पत्रकारांच्यावतीने आज सोमवार दि.२२ रोजी दुपारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप गुंजाळ होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र गांगुर्डे, तुषार वाघ,सचिन वडजे,नितीन देशमुख,रणजित देशमुख,बापू चव्हाण,अशोक निकम,अमोल जाधव,जितेंद्र विधाते,मोरे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विनय पाटील यांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. 

 याप्रसंगी रणजित देशमुख व तुषार वाघ यांनी आपल्या मनोगातून आपल्या तालुक्यातील आणखी विद्यार्थी युपीएसी तसेच एपीएसी परिक्षेला गवसणी घालतील,या हेतून विनय पाटील यांनी आपला अनुभवाच्या जोरावर इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे व त्यांच्या मार्गदर्शनाने तालुक्यातील विद्यार्थी युपीएसी तसेच एपीएसीत चमकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच विनय पाटील यांनी देखील आपण विद्यार्थ्यांना नक्कीच मार्गदर्शन करु व माझ्यानंतर लवकरात लवकर पुन्हा तालुक्यातील विद्यार्थी यशाला गवसणी घालतील असा विश्‍वास व्यक्त केला.राजेंद्र गांगुर्डे,संदीप गुंजाळ यांनी आपले मनोेगत व्यक्त केले. याप्रसंगी पत्रकार व विविध क्षेत्रातील पदाधिकारी  उपस्थित होते.