आंबेठाण चौकात वाहतुकीला अडथळा ठरतो विद्युत खांब; प्रशासन गप्प...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, चाकण
चाकण (आंबेठाण) : आंबेठाण चौकात रस्त्याच्या लगत उभा असलेला हाय व्होल्टेज विद्युत खांब अनेक दिवसांपासून वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या खांबामुळे वाहतूक कोंडी हा रोजचा अनुभव बनला आहे.
स्थानिक नागरिकांनी महावितरण विभाग व प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली असतानाही; कोणतीही कारवाई झालेली नाही. महावितरणचे अधिकारीही यावर मौन बाळगून आहेत.
या खांबामुळे शाळकरी विद्यार्थी, कामगार, रुग्णवाहिका व सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांची मागणी आहे की प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन खांब हटवण्याची कार्यवाही करावी. मात्र सध्या तरी विद्युत विभाग ह्याकडे लक्ष देताना दिसत नाही.