माकप व किसान सभा आदिवासी राष्ट्रीय अधिकार मंच'तर्फे प्रशांत लसंते यांचा सत्कार.!

माकप व किसान सभा आदिवासी राष्ट्रीय अधिकार मंच'तर्फे प्रशांत लसंते यांचा सत्कार.!

 प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी

यवतमाळ : केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या वारा या छोट्याशा गावातील राहणारा प्रशांत लसंते यांचा आदिवासी जागतिक दिन व क्रांती दिना निमित्त प्रशांत लसंते यांचा आदिवासी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पाटणबोरी येथे आदिवासी जागतिक दिन व क्रांती दिनानिमित्त मेळावा व रॅली आयोजित करण्यात आली.

त्यावेळी प्रशांत या कमी वयात आदिवासी जनतेच्या ज्वलंनत प्रश्नावर जागृत राहून सतत समाजाला मार्गदर्शन करीत असल्याबद्दल व आदिवासी समाजाची कोणतीही अडचण आल्यास सेवा करणारे व गावातील समस्यावर दवाखाना ,पाण्याचा प्रश्न रोड ,नाली, अन्नपुरवठा अनेक प्रश्न मार्गी लावणारे व तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर व जनतेच्या प्रश्नावर आपल्या लेखणीतून व  पत्रकारितेतून आदिवासी जनतेच्या समस्या मार्गी लावून देणारे.व मूर्ती लहान कीर्ती महान असे त्यांचे कार्य असल्याने त्यांच्या कार्याला सलाम करीत, पत्रकार प्रशांत लसंते यांचा सत्कार  मंचावर उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला..!