श्री भगवान विश्वकर्मा जयंती उत्सव साजरी

श्री भगवान विश्वकर्मा जयंती उत्सव साजरी

प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक

दिंडोरी येथील ईफोनोमोड ईप्लवीपमेंट फुड कंपनीत भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली,यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, श्री स्वामी समर्थ केंद्राचे आबासाहेब मोरे,भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, भाजपा तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे आदींसह मान्यवरांच्या हस्ते भगवान विश्वकर्मांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार कंपनीचे संचालक अरुण दद्दा यांनी केला, विश्वकर्मा जयंती निमित्त कंपनीतील सर्व साधन सामुग्रीचे पुजन करण्यात आले, तर कामगारांचा सन्मान करुन त्यांना भेट वस्तू देण्यात आली, यावेळी माजी उपसभापती कैलास पाटील, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा उज्वला कोथळे, प्रभाकर वडजे, नगरसेवक सुजित मुरकुटे, रणजित देशमुख, भाजपा शेतकरी सेलचे तालुकाध्यक्ष कैलास धात्रक, शेतकरी संघाचे संचालक संतोष कथार,मित्रानंद जाधव, आदींसह परिसरातील सरपंच, उपसरपंच,नगरसेवक, ग्रामस्थ, कामगार उपस्थित होते.