दिंडोरी नगरपंचायतीच्या विषय समिती निवड...

दिंडोरी नगरपंचायतीच्या विषय समिती निवड...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी नगरपंचायतीच्या विषय समित्यांसाठी पिठासिण अधिकारी तथा तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्षा सुनिता लहांगे, नियोजन व विकास समिती सभापतीपदी उपनगराध्यक्षा शैला उफाडे, आरोग्य पाणी पुरवठा व जल निस्सारण समिती सभापतीपदी मेघा धिंदळे, सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी सुजित मुरकुटे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी प्रज्ञा वाघमारे आदींची निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित सभापतींचा तहसीलदार मुकेश कांबळे व मुख्याधिकारी संदिप चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी दिंडोरी तालुका पत्रकार संघाच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले, अशोक निकम,यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी नगरसेवक प्रदिप घोरपडे,नितीन गांगुर्डे,दिपक जाधव गणेश बोरस्ते,निर्मला मवाळ, कल्पना गांगोडे,लता बोरस्ते,आशा कराटे ज्योती देशमुख प्रशासकीय अधिकारी विजय देवरे,राजेंद्र खिरकाडे आदी उपस्थित होते.