राष्ट्रवादीच्या वाहतूक विभाग जिल्हाध्यक्षपदी संजय कातकाडे यांची नियुक्ती...
![राष्ट्रवादीच्या वाहतूक विभाग जिल्हाध्यक्षपदी संजय कातकाडे यांची नियुक्ती...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66aa2b4128a4d.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाहतूक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी संजय कातकाडे यांची नियुक्ती करण्यात आली.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते कातकाडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड,शहर अध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यामध्ये संजय कातकाडे यांचे काम होत कौतुकास्पद असल्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी वाहतूक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद कांबळे,खा. अमोल कोल्हे,संतोष जगताप,किरण पालकर,विलास आहेर,दत्ता सानप, हरी आव्हाड,सचिन सुरोसे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठीप्रयत्न करणार असल्याचे कातकडे यांनी सांगितले.संजय कातकाडे यांच्या निवडीचे जिल्ह्यामध्ये सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.