BIG BREAKING : श्री क्षेत्र आळंदी जवळ असलेल्या हनुमानवाडीत बिबट्याचा हैदोस...!

BIG BREAKING : श्री क्षेत्र आळंदी जवळ असलेल्या हनुमानवाडीत बिबट्याचा हैदोस...!

News15 मराठी प्रतिनिधी सुनिल बटवाल 

चाकण(चिंबळी): श्री क्षेत्र आळंदी जवळ असलेल्या केळगाव (हनुमानवाडी) परिसरात गेल्या दोन दिवसांपूर्वी सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्या आढळला असल्याची खबर ग्रा. प. सदस्य दत्तात्रय मुंगसे यांनी दिली.

यावेळी स्थानिकांनी पोलीस प्रशासन व वनविभागाशी संपर्क साधला असता वनविभागाचे कर्मचारी यांनी तात्काळ भेट देऊन बिबट्या दिसल्यानंतर सुरक्षेबाबत आणि बचाव बाबत माहिती दिली. मात्र बिबट्याच्या वावराने गावातील वातावरण भयभीत झाले असून बिबट्या पकडण्यासाठी ताबडतोब पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ‌ वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केल्या नंतर वनविभागाच्या वतीने तात्काळ पिंजरा लावण्यात आल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

केळगाव येथील हनुमानवाडी येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत निर्माण झाली असुन या बिबट्याने दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करुन एका कुत्र्याला प्राण गमवावे लागले. त्याप्रमाणे चिंबळी येथील  कातोरे व जाधव वस्ती परिसरातही गेल्या दोन ते तीन दिवसापासुन बिबट्याचा वावर वाढला असल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर आता वनविभाग प्रशासन काय तातडीने पावले उचलताय हेच पहावे लागेल.