जिल्हा परिषद प्राथमिक हरितशाळा फडकेवस्ती येथील पहिलीत आलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत..!
![जिल्हा परिषद प्राथमिक हरितशाळा फडकेवस्ती येथील पहिलीत आलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत..!](https://news15marathi.com/uploads/images/202306/image_750x_648be61d786b3.jpg)
News15 मराठी प्रतिंनिधी सुनील बटवाल
चाकण(चिबंळी ): जिल्हा परिषद प्राथमिक हरितशाळा फडकेवस्ती येथे इयत्ता पहिलीत आलेल्या नवीन मुलांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आल्याचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी सांगीतले.
याप्रसंगी मुलांना फेटे , घालण्यात आले व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कुरुळी केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ,शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश येळवंडे यांच्या व पालकांचे हस्ते सर्व विद्यार्थांना नव्यानेच आलेल्या सर्व विषय एकत्रित असलेली नाविण्यपूर्ण पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांच्या गजबटाने मुक झालेली शाळा पुन्हा आनंदाने बोलकी झाल्याचे तसेच दप्तराचे ओझे कमी झाल्यामुळे अध्यक्ष राजेश येळवंडे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी शाळा व्यावस्थापन समितीच्या सदस्या भाग्यश्री शिरोळे, शिक्षिका सिताबाई गेंगजे,निरज लोणी,प्रियांका लुंगारे आदी मान्यवर उपस्थितीत होते.