मोहाडी येथे आज जि.प.प्राथमिक शाळेच्या इमारतीचा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ
![मोहाडी येथे आज जि.प.प्राथमिक शाळेच्या इमारतीचा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन समारंभ](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65cda333c70c9.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे आज दि. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता; हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक विभाग यांच्या सी.एस.आर निधीमधून बांधलेल्या मोहाडी येथे जि.प.प्राथमीक शाळेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित आयोजित केला आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर हे राहणार असून, केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एच.ए. एल.चे डायरेक्टर ए.बी.प्रधान, सह्याद्री फार्मचे कार्यकारी संचालक विलास शिंदे, मविप्रचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण जाधव, सरपंच आशा लहागे, उपसरपंच भाग्यश्री जाधव, ग्रामविकास अधिकारी शैलेंद्र नरवडे, मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी, शालेय समिती अध्यक्ष वाल्मीक जाधव व सदस्य एच.ए.एल.अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार असून, या उद्घाटन शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.