जनता इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय मानक ब्युरो तर्फे कार्यशाळा संपन्न...

जनता इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय मानक ब्युरो तर्फे कार्यशाळा संपन्न...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

भारतीय मानक ब्युरो अंतर्गत दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.

यामध्ये चित्रकला स्पर्धेमध्ये ५० विद्यार्थ्यांनी उत्तम चित्रकला चित्र रेखाटली होती.याप्रसंगी आय.एस.आय तसेच एफ.एस.एस. आय मानांकनाची माहिती ॲपद्वारे कशी मिळवावी याबाबतचे मार्गदर्शन मुंबई येथील अभिषेक शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा सुनिता नागरे यांनी केले .

तसेच या कार्यशाळा निमित्त मार्गदर्शन करतांना प्रा. शरद शेजवळ  म्हणाले की ग्राहकांच्या  फसवणुकीपासून नुकसान टाळण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूंची गुणवत्तेची पडताळणी करावी असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले .

यावेळी सुनीता नागरे,प्राचार्य शरद शेजवळ, उत्तम भरसट पर्यवेक्षिका प्रतिभा उशीर,सविता शिंदे,पर्यवेक्षक रावसाहेब उशीर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  समिती प्रमुख एस .एस आहेर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सरला कदम यांनी मानले. उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.