हरित सेने'मार्फत विद्यार्थ्यांना, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आव्हान...

हरित सेने'मार्फत विद्यार्थ्यांना, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आव्हान...

 प्रतिनिधी - गजू कैलासवार, यवतमाळ

पाटणबोरी --येथूनच जवळच असलेल्या झरी जामणी तालुक्यातील मांडवी येथील राजीव माध्यमिक विद्यालय येथे 16 ऑक्टोंबर 2025 रोजी हरित सेने मार्फत विद्यार्थ्यांना प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आव्हान विद्यालयाचे प्राचार्य  एस. एन.  टोंगलवार सर यांनी केले ,मोठ्या आवाजाचे फटाके व फटाक्यातून निघणारे धूर यामुळे आजाराचे प्रसार कसे होतात याबाबत माहिती देण्यात आली.

विद्यालयाचे हरित सेना प्रभारी  मीनलताई पामपट्टीवार यांनी विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्रे भरून घेण्यात आली ,व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक  के एस बेदोडकर डीजी आगलावे  बोरकुंडवार सर उपस्थित होते.

कार्यक्रमाला शिक्षकेतर कर्मचारी  राकेश एनगंटीवार सर  गजानन नुगुरुवार सर , मारोती गेडाम , श्रीकांत तुंगलवार सर, हनुमंतराव कासावार सर यांचे विशेष सहकार्य लाभले.