मोठी बातमी : चालक पदाच्या परीक्षेत अभिषेक कांदळकर राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण...

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
संगमनेर : तळेगाव दिघे गावातील सुपुत्र व शिक्षणमहर्षी गुलाबराव गोविंदराव जोंधळे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अभिषेक बाळासाहेब कांदळकर याने आपल्या मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर मुंबई पोलीस दलात चालक पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून पदाला गवसनी घातली आहे.
अभिषेकने मुंबई पोलीस दलातील चालक पदाच्या १५० गुणाच्या परीक्षेत उच्चाकी असे १४१ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अभिषेक याने आपल्या जिद्दीच्या व कष्टाच्या व अभ्यासातील सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे बोलताना सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी बोलताना सांगितले की, कोणतेही यश संपादन करताना त्या यशाची मुहूर्तमेढ ही विद्यालयीन दशेतच रोवली जाते. कोणत्याही यशाचे बाळकडू हे विद्यार्थी दशेतच मनात बिंबवले जाते त्यातून पुढे यश संपादन केले जाते. पण यश कोणतेही असो त्यासाठी परिश्रम घ्यावेच लागतात तेच अभिषेकने आपल्या यशातून दाखवून दिले आहे असे प्राचार्य यांनी बोलताना सांगितले.
यावेळी विद्यालयाकडून एक गुणवंत माजी विद्यार्थी म्हणून अभिषेक कांदळकर यांचा सत्कार करून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या. यासत्कार प्रसंगी अभिषेकच्या यशस्वी वाटचालीत त्याच्या बरोबर असणारे आणि पालक म्हणून साथ देणारे त्याचे वडील बाळासाहेब कांदळकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर अभिषेक याने माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला म्हणून कृतज्ञता व्यक्त करीत विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय दिघे, पर्यवेक्षक बी. सी. दिघे, प्रभाकर जोरी, एकनाथ जोंधळे, दिलीप ताजने, बी. एस. फटांगरे, मच्छिन्द्र कासार, संजय डोगरे, निलेश भिडे, योगेश गांगुर्डे, राम गायकवाड, रवीकिरण जोंधळे, महेश उगार, राकेश झनान, भूषण जाधव, एस. आर. दिघे, युवराज गायकवाड, गोरख दिघे, अविनाश बिऱ्हाडे, अश्विनी बिऱ्हाडे, आशा पन्हाळकर, अश्विनी कुऱ्हाडे, भाऊसाहेब दिघे, ओंकार भागवत आदी. शिक्षक,मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय दिघे यांनी केले. तर आभार बी. सी. दिघे यांनी मानले.