दिंडोरी जि.प. प्राथमीक शाळेचा अनोखा उपक्रम.! एक गोष्ट लेखकाची या उपक्रमाचे मान्यवरणकडून कौतुक...

दिंडोरी जि.प. प्राथमीक शाळेचा अनोखा उपक्रम.! एक गोष्ट लेखकाची या उपक्रमाचे मान्यवरणकडून कौतुक...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिंडोरी क्रं १ चे मुख्याध्यापक नितिन बागुल यांनी आपल्या संकल्पनेतून, एक गोष्ट लेखकाची हा नवीन उपक्रम दर शनिवारी सुरू केला. त्यामुळे मान्यवरांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

त्याचे कारणही तसेच आहे सध्या मुलाचे वाचन कमी झाले आहे. मुले, पालक वाचत नाही. म्हणून सर्वच जन नाराजीचा सुर लावतात त्यावर उपाय म्हणून आठवड्याच्या शनिवारी एका लेखकाने शाळेतील मुलाना त्याची गोष्ट, कविता सांगायची व मुलांच्या प्रश्नांना उतर द्यायचे आसा अनोखा उपक्रम नाशिक जिल्हयात प्रथमच दिंडोरी शाळा क्रं १ मध्ये घेण्यात आला.

या उपक्रमाला आज शनिवार दि.१७ रोजी सुरुवात करण्यात आली असून यामध्ये प्रथम पुष्प लेखक कवी दिंडोरी भूषण पुरस्काराने सन्मानित राजेंद्र गांगुर्डे.यांनी गुफले यावेळी त्यांनी त्यांच्या इरदडी या पुस्तकावर गप्पा गोष्टी करून कविता सादर केली विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना समाधान कारक उत्तरे दिली.

प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी गावचे भूषण भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविणारे व दिंडोरी शाळा क्रं १ चे माजि विध्यार्थी विनय पाटिल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की त्यांनी विद्यार्थींना  नियमीत अभ्यास केला तरच यश प्राप्त होते.आता पासूनच काही चांगल्या सवई मुलांनी आपल्यात रुजविल्या पाहिजे मोबाईलचा वापर कमी करावा असे सांगून

शाळेतील गुणवंत विद्यार्थ्याचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपत बोरस्ते होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर.के. जाधव, रमेश कोराळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बागूल यांनी केले तर सुत्रसंचलन श्रीमती राऊत यांनी केले तर आभार संगीत चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  किरण बोरसे, कैलस बागंड , नंदकिशोर नागपुरे, श्रीमती निकम , इंदिरा भागवत , ज्योती नगरे, नीलिमा जोशी, सायरा तडवी, संगिता महाजन, अर्चना पवार आदींनी परिश्रम घेतले.