लाडकी बहीन रक्षाबंधनच्या अगोदरच रुसल्याचे चित्र? लाडकी बहिण योजनाने बँका हाउसफुल...
![लाडकी बहीन रक्षाबंधनच्या अगोदरच रुसल्याचे चित्र? लाडकी बहिण योजनाने बँका हाउसफुल...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66c05dd68affc.jpg)
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना चालू केली असून, लातूर जिल्ह्यातील बऱ्याच बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे कळताच; किनगाव येथील बँका हाउसफुल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
परंतु बँकेचे सरर्वर डाऊन तर नेट गायब अशा परिस्थितीत.! आधार कार्ड बँकेची सलग्न न झाल्यामुळे, लाडकी बहीण खात्यावर पैसे जमा न झाल्याचे समजताच निराश हताश होऊन घरी परतू लागले आहे. कर्मचारी सांगतात डेबिटी करा, आधार कार्ड खात्याशी संलग्न करा, काय करणार? लाडकी बहीन रक्षाबंधनच्या अगोदरच रुसल्याचे चित्र दिसत आहे.