रोटरी क्लब, कुरकुंभ दौंड पोलीस व बारामती RTO यांच्या संयुक्त विद्यमाने जीव सुरक्षा अभियान...
![रोटरी क्लब, कुरकुंभ दौंड पोलीस व बारामती RTO यांच्या संयुक्त विद्यमाने जीव सुरक्षा अभियान...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64d6385d901f6.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - परशुराम निखळे, दौंड
पुणे जिल्ह्याच्या दौड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत येथे; रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ Midc तसेच दौंड - कुरकुंभ पोलीस आणि बारामती आर टी ओ यांच्या संयुक्त विद्यमाने जीव सुरक्षा अभियान भव्य दुचाकी वाहन परवाना लर्निंग उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती राजेंद्र केसकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी ज्या दुचाकी चालकांना वाहन परवाना नाही त्यांचे लर्निंग परवाने काढण्यात आले. यावेळी दौंड उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश हांगे, हर्षदा खरतोडे,दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तसेच कुरकुंभ रोटरी क्लब चे पदाधिकारी व कंपन्यांचे व्यवस्थापक कामगार वर्ग उपस्तिथ होते.