लोहिया विद्यालयाच्या ध्रुवची विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड...
![लोहिया विद्यालयाच्या ध्रुवची विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64d5d594f1b74.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, सडक अर्जुनी
लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित; रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथील वर्ग ९ चा विद्यार्थी.! ध्रुव अनिल कापगते या विद्यार्थ्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय म रा.पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,गोंदिया यांच्या द्वारा दि. ८ व ९ऑगस्ट २०२३ ला गोंदिया येथे जिल्हास्तरीय फ्री स्टाईल १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्याची चंद्रपूर येथील विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
ध्रुव'च्या या यशाबद्दल मा. जगदीश लोहिया संस्थापक - संस्थाध्यक्ष लो. शि. संस्था, मा. पंकज लोहिया सदस्य लो. शि.संस्था, प्राचार्य मा. मधुसूदन अग्रवाल, मा. गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे, पर्यवेक्षक श्री. डी .एस. तेंभुरणे, प्राध्यापक मा.आर . एन. अग्रवाल तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. व विभागीय स्तराच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.