बुमराहाची रिप्लेसमेंट ठरली, मोहम्मद सिराजची वर्ल्डकप संघात एंट्री

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे.

बुमराहाची रिप्लेसमेंट ठरली, मोहम्मद सिराजची वर्ल्डकप संघात एंट्री

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. BCCI ने अधिकृत वृत्त दिले नसले तरी PTI ने याबाबतचे वृत्त दिले आहे. आता, बुमराहच्याजागी मोहम्मद सिराजला विश्वचषक स्पर्धेत संधी मिळाली आहे. भारतीय क्रिकेट निवड समितीने यासंदर्भातील घोषणा केली. सिराज सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी सामने खेळत आहे. मात्र, त्याला तेथून भारतात बोलविण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी सराव सत्रात जसप्रीतच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याने या सामन्यातून माघार घेतली. पण, आता हाती आलेल्या बातमीनुसार तो वर्ल्ड कपही खेळणार नाही. सध्या, ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यास मैदानावर उतरला आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेला मुकल्यानंतर प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले. तीन सामन्यांपैकी दोनच सामने तो खेळला, परंतु काही खास कामगिरी झाली नाही. आता हाती आलेल्या बातमीनुसार त्याच्या पाठीची दुखापत गंभीर आहे, त्यावर शस्त्रक्रियेची गरज नाही, परंतु ४-६ महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.