हुस्सा येथे श्री चक्रधर स्वामी यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल....
![हुस्सा येथे श्री चक्रधर स्वामी यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल....](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_643123af31ac2.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : शिवराज होनशेटे
नांदेड : नायगाव तालुक्यातील श्रीं. क्षेत्र हुस्सा नगरिमध्ये श्री कृष्ण ज्ञान मंदिराच्या व गावकऱ्याच्यावतीने भव्य यात्रा व कुस्त्यांची भव्य दंगलचा कार्यक्रम आयोजित केले असून, ही यात्रा गेले अनेक दशके पासून चालत आलेली परंपरा सातत्याने हुस्सा नगरी मध्ये आयोजित केली जाते.
हुस्सा नगरी ही धार्मिक विचारांनी, कलाकारांनी रंगलेली नटलेली; याच नागरिमध्ये दि. 10/4/2023 रोजी गोपाळांचा मेळाने गावामध्ये ''गोपाळा गोपाळा रे देविकी नंदन गोपाळा या जयघोषत भक्ताचा जाणसागर जमणार आहे. या यात्रे निमित्त गावामध्ये मोठ्या उत्साहात भव्य पालखी सोहळा गोपीकेच्या व कान्हाच्या रूपाने भक्ताच समवेत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. हुस्सा ही नगरी भक्ताच्या गर्दीने बहरून जाणार असल्याचे माहिती श्री कृष्ण ज्ञान मंदिराचे मठाधीश प. पु. प. विश्वास बाबा मेहकरकर यांनी दिले आहे. आणि दि. 11/4/2023 रोजी गावामध्ये जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील नामवंत, तगड्या पैलवानाचा कुस्तीचा दंगल भरणार असून सदर कुस्त्यांची शेवटची बक्षीस 5051 तर दुसरी कुस्ती 3051ची असणार आहे. आणि बाकीचे मर्जिप्रमाणे कुस्त्या लावण्यात येणार आहे. तरी या यात्रेचा व कुस्त्याचा हुस्सा व हुस्सा परिसरातील सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री कृष्ण ज्ञान मंदिर व गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.