यवतमाळच्या ७४ स्केटिंग खेळाडूचा विक्रम...

यवतमाळच्या ७४ स्केटिंग खेळाडूचा विक्रम...

 प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी (यवतमाळ)

सलग ७८ मिनिट नॉन स्टॉप स्केटिंग करत  : Influencer  book of World records, Icon Ambassador book of world records, Indo Asian Records, या ३ रेकॉर्ड मध्ये नोंद.!  स्वातंत्र्य दिनानिमित्त दि . १५ ऑगष्ट रोजी  विनादेवी दर्डा स्कुल व  जय स्कोटिंग क्लबच्यावतीने विनादेवी दर्डा स्कुल च्या स्केटिंग रिंगवर येथे ७४ स्केटिंग खेळाडूंनी सलग ७८ मिनिटे  स्केटिंग करत नवा विक्रम प्रस्थापित केला.

या रेकॉर्डची सुरुवात सायंकाळी ४  वाजता सुरूवात करण्यात आली. प्रसाद मिसाळ सर ( विनादेवी दर्डा स्कूल) व प्रफुल्ल गणेश जुमळे सर (इंडिअन आर्मो) यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखऊन सुरु झाली. या सलग ७८ मिनिटे स्केटिग झाल्यानंतर सायंकाळी  ५ वाजून १८ मिनिटाने या रेकॉडी समाप्ती झाली. 

 यावेळी अमिन नूरानी सर ( वीनादेवी दार्ड स्कुल च्या प्राचार्य ), प्रशिक्षक प्रविण दिघाडे, महिला स्केटिंग प्रशिक्षका वंदना दिघाडे यांच्या हस्ते मुलांना मेडल तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. सदर विक्रम पाहण्यासाठी खेळाडू व पालक उपस्थित होते. 

सदरचे विक्रम यवतमाळ जिल्हात प्रथमच झाले असून, सर्वत्र खेळाडूवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या खेळाडूंमध्ये पाटणबोरी येथील रहिवासी चिमुकला चि. विराज निखिल शहाकार हा सुद्धा सहभागी झाला होता. तो सद्ध्या पांढरकवडा येथील Era English medium school येथे इ. २ री मध्ये शिक्षण घेत असून, त्याने पाटणबोरी येथे सराव करून हे यश मिळवले. त्याने त्याच्या यशाचे श्रेय त्याचे स्केटिंगचे coach, शाळेचे प्राचार्य, शाळेचे coach व आईवडील यांना दिले.