जिल्हास्तरीय सब ज्युनियर रोलबॉल अजिंक्य पद स्पर्धा २८जुलैला...
![जिल्हास्तरीय सब ज्युनियर रोलबॉल अजिंक्य पद स्पर्धा २८जुलैला...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_669bd04db8edd.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी - नासिक जिल्हा रोलबाॅल असोसिएशनच्या वतीने मराठा हायस्कूल नाशिक येथे २८ जुलै रविवार रोजी १४ वर्षे वयोगटाच्या मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय रोलबाॅल अजिंकपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहेत. स्पर्धेत विजय संघाला प्रमाणपत्र व पदक दिले जाईल. व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जातील या स्पर्धेतून बुलढाणा येथे महाराष्ट्र राज्य रोलबाॅल संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १८ व्या सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचा रोलबाॅल संघ निवडण्यात येईल. अशी माहिती नाशिक जिल्हा रोलबाॅल संघटनेचे सचिव बाळासाहेब रायते यांनी दिली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण व हर्षवर्धन गावित यांनी केले.तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख सागर झनकर,सुयश कुंभार्डे, वैभव भोसले प्रयत्नशील आहे.