दिंडोरी जनता विद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

दिंडोरी जनता विद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय अंतर्गत क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे संचालक प्रवीण जाधव होते. यावेळी मविप्र माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव,सदस्य उद्धव मोरे,सुभाष बोरस्ते,राजेंद्र उफाडे,सोमनाथ सोनवणे,चिंतामण जाधव,मधुकर जाधव,केशव खराटे,सुभाष जाधव,मनोज ढिकले, कृष्णा मातेरे, आदींच्या उपस्थितीतीत संपन्न झाला.

मान्यवरांच्या हस्ते मशाल ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.मशालीचे संचालन विद्यालयाचा पंतप्रधान कु.विशाल पाटील व सहभागी क्रीडा संघ विद्यार्थी यांनी केले.ध्वजाचे ध्वजारोहन प्रवीण नाना जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून "आपण खेळामध्ये का मागे? सर्वांनी खेळ खेळला पाहिजे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.प्रत्येकाला पोहता आले पाहिजे. पळता आलं पाहिजे विविध बौद्धिक खेळ खेळता आले पाहिजे ज्याच्यातून आपले कौशल्य विकसित होईल. ऑलिंपिक स्पर्धांचा इतिहास बघता आपल्या देशाची लोकसंख्या इतकी मोठी असून सुद्धा आपण मेडल जिंकण्यात का कमी पडतो ?अशी खंत नानांनी व्यक्त केली जर तुमच्यातले विद्यार्थी आतापासून चांगला सराव केला उत्कृष्ट मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेतले तर आपण आपला नावलौकिक देशाचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवरती  उंचवू शकतो तसेच आपण सद्गुनी व्हावे शिस्त,गुणवत्ता पारदर्शकता यातून तर जीवन घडवावेच परंतु सर्वांनाच सर्व खेळता आलेच पाहिजेत अशी उत्साही भावना व्यक्त करून कमीत कमी खेळांचे नाव तरी माहित पाहिजेत आज मोबाईलचा जमाना आहे मुलं मोबाईल वरचे गेम खेळण्यात रममान होतात त्यापेक्षा प्रत्यक्षातले गेम खेळावेत यासाठी आपण सर्वजण आज शपथच घेऊया ती अशी" की मी आजपासून कमी वेळ मोबाईल वापरेल मोबाईल वरचे गेम खेळणार नाही मोबाईलचा चांगल्या ज्ञानासाठी चांगल्या माहितीसाठी योग्य तेवढाच वापर करेल अतिरिक्त वापर करणार नाही." 

यावेळी इयत्ता ५ वी लंगडी पळी, इयत्ता ६ वी डॉस बॉल,इयत्ता ७ वी खो खो,इयत्ता ८वी कब्बडी,इयत्ता ९ वी हॉलीबॉल,१० वी रस्सीखेच इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.आकाशामध्ये रंगीत फुगे सोडून या क्रीडा महोत्सवाची आनंदाने व उत्साहाने सुरुवात केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा देशमुख आभार संतोष कथार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य,उपप्राचार्य,पर्यवेक्षक,सर्व जेष्ठ शिक्षक,वर्गशिक्षक,क्रीडा व कला शिक्षक,कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.